घनश्याम कडू
उरण : उरणमधील पिरकोन सारडे रस्त्यावरील एमडीसी हॉटेल समोरील रस्त्यावर एका अज्ञात महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन तपास सुरू आहे. महिलेची ओळख पटलेली नाही.
आज सकाळी पिरकोन सारडे रस्त्यावर असलेल्या एमडीएस हॉटेल जवळ एका महिलेचा मृतदेह सापडला. सदर महिलेच्या गळ्यावर वार केल्याचे दिसत आहे. महिलेचा रंग गोरा असून अंगावर गुलाबी साडी व पायात चप्पल आहे. गळ्यात व पायात काहीही दिसत नाही. सदर महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्ष असावे. त्यामुळे सदर महिला या परिसरातील दिसत नसल्याचे आजूबाजूचे नागरिक सांगतात.
सदर अज्ञात महिलेची हत्या करून याठिकाणी तिला टाकून मारेकरी फरार झाल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन त्यांनी तपास सुरू केला आहे. सदर महिलेची ओळख पटलेली नाही. उरणमध्ये रेल्वे सुरू होण्याच्या आधीच या घटना घडू लागल्याने उरणच्या जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.