पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अजित गटाचे नेते छगन भुजबळ यांना काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमानंतर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहकाऱ्याच्या मोबाईलवर फोन करून धमकी देण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला महाड मधून अटक केली असून दारूच्या नशेत त्याने ही धमकी दिल्याचे तपासात पुढे आले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आज छगन भुजबळ पुण्याहून मुंबईला रवाना होणार आहेत.
प्रशांत पाटील असे धमकी देणाऱ्याचे नाव असून टु मूळचा कोल्हापूरचा आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अजित गटाचे नेते छगन भुजबळ हे काल पुणे दौऱ्यावर होते. पुण्यात त्याने काही ठिकाणी कार्यक्रम झाल्यावर ते नाशिकला रवाना झाले होते. छगन भुजबळ भुजबळ हे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू होते. मात्र, त्यांनी बंडखोरी करत अजित गटात सामील झाले आहे. दरम्यान, काल त्यांना त्यांच्या कार्यालयातील सहकाऱ्याच्या मोबाईलवर फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
छगन भुजबळ यांची सुपारी मिळाली असून त्यांना ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली होती. या पूर्वी देखील छगन भुजबळ यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला होता. आरोपीच्या फोनचा माग काढत त्याला महाड मधून पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आरोपी प्रशांत पाटील हा दारू प्यायला होता. दारूच्या नशेत त्याने ही धमकी दिल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याला अटक केली असून पुढील कारवाईसाठी त्याला पुण्यात आणले जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे.