पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आता वेगाने सुरू झाला असून हे प्रकरण सीआयडीकडे (CID) वर्ग करण्यात आले आहे. सीआयडीचे पोलीस महानिरीक्षक बसवराज आणि सुधीर हिरेमठ यांनी नुकतीच अपघातस्थळाला भेट देऊन महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले आहेत. मात्र, या तपासादरम्यान अजितदादांच्या मृतदेहाच्या ओळखीबाबत एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
ओळख घड्याळावरून पटल्याचा दावा फेटाळला
सुरुवातीला अशी चर्चा होती की, अजित पवार यांच्या हातातील घड्याळावरून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली. मात्र, वरिष्ठ पोलिसांनी हा दावा खोडून काढला आहे. तपासात समोर आलेल्या तथ्येनुसार, ती ओळख घड्याळावरून झाली नव्हती.
कशी पटली मृतदेहाची ओळख?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी खालील बाबी महत्त्वाच्या ठरल्या:
कुर्त्याची विशिष्ट डिझाईन: अजितदादांच्या कुर्त्याच्या उजव्या बाजूला एक विशिष्ट प्रकारचे कापड आणि त्यावर एक खास डिझाईन होती. त्यावरून पोलिसांना हा मृतदेह अजित पवारांचा असल्याची प्राथमिक खात्री पटली.
घड्याळाचा संभ्रम: डाव्या हातावर जो भाग घड्याळासारखा वाटत होता, तो प्रत्यक्षात घड्याळ नसून शर्टचाच एक भाग होता, असे स्पष्ट झाले आहे.
DNA अहवालानंतरच अंतिम शिक्कामोर्तब
पोलिसांनी कपड्यांवरून प्राथमिक ओळख पटवली असली तरी, कोणतीही कायदेशीर चूक होऊ नये यासाठी DNA चाचणी करण्यात आली. या वैज्ञानिक चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृतदेहांची ओळख अधिकृतपणे निश्चित करण्यात आली आणि त्यानंतरच पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
दशक्रिया विधी होणार नाही
या दुर्दैवी घटनेनंतर पवार कुटुंबाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी माहिती दिली की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दशक्रिया विधी केला जाणार नाही.
