• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा

ByEditor

Jul 15, 2024

घनःश्याम कडू
उरण :
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच इच्छुकांची भाऊगर्दी वाढू लागली आहे. नुकतीच काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत महाविकास आघाडीतून उरण विधानसभेवर काँग्रेस पक्षानी दावा करून रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांना उमेदवारी देण्याचा ठराव घेऊन तो वरिष्ठांना पाठविला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळण्याच्या आशा वाढल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आघाडीतील घटक पक्षांनी उमेदवारी मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नुकतीच काँग्रेस पक्षाची शेलघर उलवे नोड येथे उरण विधानसभा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उरण विधानसभेवर दावा करून आघाडीचे उमेदवार म्हणून रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनाच उमेदवारी द्यावी असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. सदरचा ठराव काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठविण्यात आल्याचे समजते.सदर बैठकीस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, डॉ. मनिष पाटील, महेंद्र ठाकूर, जे. डी. जोशी, नाना म्हात्रे, मिलिंद पाडगावकर, अकलाक शिलोत्री, मार्तंड नाखवा, कमलाकर घरत, देविदास थळी, सदा पाटील, रेखा घरत आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उरण विधानसभा जागेवर शिवसेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेनेचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्ष व शेकापनेही या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून उरणची जागा कोणाच्या वाट्याला जाते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!