• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पतीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नीस ७ वर्ष सक्त कारावासाची शिक्षा

ByEditor

Jul 11, 2023

सलीम शेख
माणगांव :
पोलादपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दि. ५ एप्रिल २०१५ रोजी सकाळी १०.१५ वाजता मौजे कापडे गावच्या हद्दीत सदरील घटना घडली होती. सदर घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, आरोपी पुजा अजित वर्मा ही फिर्यादी अजित परमेश्वर वर्मा याची पत्नी असून ती फिर्यादीचे इतर मुलींशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने भांडण केल्यामुळे फिर्यादी यांनी आपले पत्नीस शांत करण्याचे उद्देशाने त्याचे घरांतील स्टोव्हमधील रॉकेल अंगावर ओतुन घेतले असता त्याचे पत्नी पुजा हिने शांत न होता आपले पतीचे अंगावर माचीसची काडी पेटवून आग लावून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

या घटनेची फिर्याद पोलादपूर पोलिसांनी घेऊन भा. द. वि. सं. कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पोलादपूर ठाणे एस. बी. पाटील यांनी केला. व सदरचे दोषारोप पत्र मा. जिल्हा व सत्र न्यायालय माणगाव येथे दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी मा. अति सत्र न्यायालय, माणगाव रायगड येथे झाली व सदर गुन्ह्यात फिर्यादी, वैद्यकिय अधिकारी व निवासी तहसिलदार यांची साक्ष महत्वाची ठरली. सदर खटल्यामध्ये अति. शासकिय अभियोक्ता जितेंद्र म्हात्रे माणगाव रायगड यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले व कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले. सदर केसच्या सुनावणी दरम्यान तत्कालीन पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यु. एल. घुमास्कर, छाया कोपनर, पो. ह. शशिकांत कासार, शशिकांत गोविलकर, सोमनाथ ढाकणे यांनी सहकार्य केले. तसेच मा. सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी सदर घटनेतील गुन्ह्याच्या शावीतीनंतर आरोपी पुजा अजित वर्मा यांस दोषी ठरवून दि. १० जुलै २०२३ रोजी ७ वर्ष सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!