वैभव कळस
म्हसळा : गुरचरण /गायरान निवासी अतिक्रमण त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी रा. जि. प. अलिबाग यांनी लेखी पत्राद्वारे कळविले होते. या विषयान्वये ग्रामपंचायत देवघर यांनी नियमाकुल आणि अतिक्रमण निष्कासन कारवाई स्थगित करणे करिता ठराव घेऊन तो एकमताने मंजुरी घेऊन तसें निवेदन आज दिनांक ११ जुलै २०२३ रोजी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी समीर घारे आणी गटविकास अधिकारी बापूसाहेब पोळ यांचेकडे देण्यात आले.
या प्रसंगी देवघर ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष संतोष पाखड, सरपंच सौजन्या पोटले, उपसरपंच कृष्णा दिवेकर, सदस्या नयना चौकेकर, शिवराम बांद्रे, मनोहर चौकेकर, गणपत मुंडे, सुजित पोटले, गीतेश गिजे आदि मान्यवर उपस्थित होते.
हा विषय ग्रामपंचायत अखत्यारीत येत असून ग्रामपंचायत स्तरावर मीटिंग घेऊन त्याबाबत योग्य तोडगा काढावा, मात्र यासाठी लागणारे मार्गदर्शन करण्याचे आश्वासन तहसीलदार समीर घारे यांनी दिले. |