• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गणेशोत्सवाला महागाईची झळ, यंदा गणपतीची मूर्तीही महागणार!

ByEditor

Jul 11, 2023

किरण लाड
नागोठणे :
भारतात तसेच परदेशात मोठ्या भक्तिभावाने, जल्लोषात साजरा होणारा उत्सव म्हणजे ‘गणेशोत्सव’. सर्वांंचे आराध्य दैवत श्री गणेशाच्या आगमनाचे वेध श्रावण महिन्यापासूनच लागतात. श्रावण संपला कि,भाद्रपद महिन्यामध्ये लाडक्या बाप्पाचे आगमन होते. मात्र यंदा गणेशोत्सवालाही महागाईच्या झळा बसणार असून शाडुची माती, प्लॅस्टर ऑफ पॅरीस, कलर, वाहतुकीचे दर, मजुरी यांचे दार वाढल्याने यंदा बाप्पाच्या मुर्ती महागणार आहेत.

गणेश मुर्ती तयार करताना लागणारा महत्वाचा घटक म्हणजे माती. साधारणतः कारखान्यात गणेश मुर्तीचे दोन प्रकार उपलब्ध असतात, एक शाडुच्या मातीचा, दुसरा प्लॅस्टर ऑफ पॅरीसचा म्हणजेच पीओपीचा, ही दोन्ही प्रकारची माती बाहेरून आणली जाते. गुजरात येथील खाणीतुन शाडुची माती प्रक्रिया करून तयार केली जाते तर, ‘जिप्सम’ हे नैसर्गिकरित्या आढळणारे कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट सुमारे 120 अंश ते 220 अंश तापमानापर्यंत तापविल्यास त्यातील सुमारे 3/4 पाणी निघून जाऊन जो पदार्थ तयार होतो त्या पदार्थाला प्लॅस्टर ऑफ पॅरीस असे म्हटले जाते. पॅरीस जवळ जिप्समाचा वापर प्लॅस्टर व सिमेंट तयार करण्यासाठी प्रथम करण्यात आला, म्हणून त्याला प्लॅस्टर ऑफ पॅरीस हे नाव देण्यात आले.

श्री गणेश कलामंदिर केएमजी विभाग, कुंभारआळी येथील गणपती कारखानदार दीपक वाडेकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले कि, शाडुची माती, पिओपी, कलर, मजुरी, जागेचे भाडे, लाईट बिल, माल वाहतुकीची साधने इत्यादी गणपती तयार करताना लागणाऱ्या साहित्यांच्या किंमतीमध्ये 8 ते 10 टक्क्यांनी वाढ झाल्याने यंदा गणपतीच्या मुर्तीच्या किंमतीमध्ये नाईलाजाने वाढ करावी लागणार आहे. सहाजिकच या वाढीचा फटका गणेश भक्तांना बसणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!