• Sat. Jul 12th, 2025 2:34:45 PM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आरपीएफ उपनिरीक्षकाला ७० हजाराची लाच घेताना अटक

ByEditor

Jul 18, 2024

घन:श्याम कडू
उरण :
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईतील रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) एका उपनिरीक्षकाला तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

या तक्रारीच्या आधारे आरपीएफ पोलीस स्टेशन, उरण, नवी मुंबई येथे तैनात असलेल्या उपनिरीक्षकाविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे न्यायालयात 20 जुलै 2024 रोजी होणारी सुनावणी प्रलंबित असताना जप्त केलेला ट्रेलर सोडण्याच्या बदल्यात आरोपीने लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. तक्रारीनुसार, न्यायालयाने ट्रेलर सोडण्याचा आदेश दिला तरी लाच दिल्याशिवाय तो सोडला जाणार नाही, अशी आरोपीने तक्रारदाराला धमकी दिली होती.

सीबीआयने सापळा रचून आरोपीला तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. 16 जुलै 2024 रोजी आरोपीस अटक करण्यात आली आणि त्यानंतर आरोपीला सक्षम न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 19 जुलै 2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासाचा एक भाग म्हणून, सीबीआयने ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील आरोपींच्या निवासस्थानाची झडती घेतली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!