• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावात मोहर्रम सण उत्साहात साजरा

ByEditor

Jul 17, 2024

सलीम शेख
माणगाव :
सालाबादप्रमाणे यावर्षीही माणगावात मोहर्रम सण बुधवार, दि. १७ जुलै २०२४ रोजी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. या मोहर्रम सणानिमित्त माणगाव बाजारटेप मोहल्ला येथील मुस्लिम बांधवांनी ताबुताची विसर्जन मिरवणूक वाजत-गाजत काढली होती. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बकरी ईदनंतर २० दिवसांनी मोहर्रम इस्लामी महिना सुरू होतो. चंद्रदर्शन झाल्यावर त्या रात्रीपासून मोहर्रम सणानिमित्त शहीद हसन व हुसैन यांच्यावर आधारित चरित्राचे वाचन मजलीसच्या निमित्ताने मुस्लिम बांधव करीत असतात. हा महिना तसा दुःखाचा मानला जातो. परंतु, गेली अनेकवर्षापासून पारंपरिक पद्धतीने ताबुत काढून वाजतगाजत काही मुस्लिम बांधव हा मोहर्रम सण साजरा करीत असतात. यावर्षीही माणगाव नगरपंचायत हद्दीतील बाजारटेप मोहल्ला येथे बुधवारी दुपारनंतर मुस्लिम बांधवांनी ताबुताची विसर्जन मिरवणूक काढून हा ताबूत दारोदारी नेऊन मुस्लिम बांधवांबरोबरच हिंदू बांधवांनी त्याचे दर्शन घेतले. सायंकाळी उशिरा या ताबुताचे माणगाव काळ नदीत उत्साहात विसर्जन करण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!