रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली. माणगाव ते लोणेरे दरम्यान वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तळेगाव येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूकीला अडथळा येतोय. तासाभरापासून दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प असून प्रवासी अडकून पडले आहेत.