• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

‘भजनामृत’ भजन स्पर्धेत हनुमान भजन मंडळ बेलवडे द्वितीय क्रमांकाचे मानकरी

ByEditor

Aug 8, 2024

हभप बाबुराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे बेलवडे ग्रामस्थांनी केले अभिनंदन

विनायक पाटील
पेण :
पेण-सुधागड विधानसभा मतदार संघ भारतीय जनता पार्टी तर्फे भजनामृत भजन स्पर्धा २०२४ वारकरी भजन आणि संगीत भजन स्पर्धेचे दि. ५, ६, ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायं. ७ वाजेपर्यंत हॉटेल सौभाग्य इन मेगा हॉल गणपती वाडी पेण येथे आयोजन करण्यात आले होते. या भजन स्पर्धेमध्ये हनुमान भजन मंडळ बेलवडे हे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. हे पारितोषिक त्यांना पंडित भीमसेन जोशी यांचे पट्ट शिष्य आनंद भाटे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

हनुमान भजन मंडळ बेलवडे यांना हे पारितोषिक मिळाले आहे त्याचे खरे मानकरी गायक हभप बाबुराव पाटील असल्याचे ग्रामस्थांनी सांगून त्यांचे अभिनंदन केले. गायक हभप बाबुराव पाटील यांच्या बद्दल सांगायचे झाले तर ते शाश्त्रोक्त गायक असून त्यांच्याकडे स्पष्ट भाषाशैली आहे. तसेच त्यांच्या वागण्यात नम्रता असून ते नेहमी हसत खेळत राहतात. त्यांचा स्वभाव शांत व मनमिळाऊ असल्याने ते सर्वांमध्ये लगेच मिसळून जातात. हभप बाबुराव पाटील यांना याआधीही अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

पेण विधानसभा मतदारसंघ भजनामृत भजन स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरल्यानंतर हभप बाबुराव पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की, हा सन्मान माझा एकट्याचा नसून माझ्या सोबत असणाऱ्या हनुमान भजन मंडळ बेलवडे व ग्रामस्थांचा आहे. आमच्या भजन मंडळाला नेहमीच ग्रामस्थांचं प्रोत्साहन मिळत असते. बेलवडे ग्रामस्थांची सोबत आहे म्हणूनच आम्ही इथपर्यंत पोहोचलो असल्याचेही त्यांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!