• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाडमध्ये दहावीतील विद्यार्थ्याची डोक्यात बंदुकीची गोळी घालून आत्महत्या

ByEditor

Aug 8, 2024

मिलिंद माने
महाड :
शहरातील तांबट आळीमधील दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुयश सुनील नगरकर या विद्यार्थ्याने घरातील वडिलांचे शिकारीच्या बंदुकीने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार महाडमध्ये घडला.

महाड शहरामधील तांबट आळीमधील सुनील नगरकर यांचा दहावीत शिकणारा मुलगा सुयश नगरकर याने घरातील शिकारीची बंदूक घेऊन डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. त्यामध्ये सुयश नगरकर हा जागीच मृत पावल्याने याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. महाड शहरातील तांबट आळीमध्ये राहणारे सुनील नगरकर यांनी शिकारीसाठी बंदुकीचा परवाना घेतला होता. घरामध्ये असणारी बंदुकीची कल्पना त्यांच्या दहावीत शिकणाऱ्या सुयशला पूर्वीपासूनच होती. मात्र आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्याच बंदुकीचा चाप ओढून डोक्यात गोळी घालून घेण्याचा प्रकार सुयश नगरकर या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केल्याने याबाबत तांबट आणि परिसरात व महाडमध्ये तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. याबाबत महाड शहर पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!