विनायक पाटील
पेण : पेण एज्युकेशन सोसायटी सेवक सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली असून अध्यक्षपदी धनाजी रामभाऊ घरत, उपाध्यक्षपदी गौरव सुनित चऱ्हाटे तर सचिवपदी सुनिल पांडुरंग खेडकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर संचालक म्हणून अर्चना गोविंद नेमाडे, सुजाता सुनिल जाधव, संतोष आबा जाधव, सतिशकुमार नारायणराव पवार, भास्कर चिंध्या देशमुख, शिवसजन राजाराम कान्हेकर, अरूण दत्तात्रय कांबळे यांची बिनविरोध निवड अध्यासी अधिकारी सुभाष काळे यांनी जाहीर केली व सर्वांचे अभिनंदन केले.
अध्यक्षपदी निवड झालेल्या धनाजी घरत यांनी मनोगतात सांगितले की, सहाय्यक निबंधक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी अधिकारी चौधरी साहेब व सोनावणे साहेब यांच्या सूचनेनुसार सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी यांच्या सहकार्याने पतसंस्थेच्या माध्यमातून सर्व सभासदांना बरोबर घेऊन आपली पतसंस्था सर्वांच्या हिताचे व योग्य निर्णय घेऊन पतसंस्थेच्या भरभराटीस व नावलौकीकास हातभार लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी आभार सचिव सुनिल खेडकर यांनी मानले. यावेळी निवड झालेल्या सदस्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.