• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कुरुळ ग्रामपंचायतीचा लाचखोर ग्रामसेवक, लिपिक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!

ByEditor

Aug 21, 2024

प्रतिनिधी
अलिबाग :
रायगड जिल्ह्यातील कुरुळ येथे घरास घरपट्टी आकारून असेसमेंट उतारा मिळणेकरीता लाचखोर ग्रामसेवक श्रीहरी अर्जुनराव खरात, (वय ३६ वर्षे, ग्रामसेवक, नेमणूक- कुरुळ ग्रामपंचायत, अलिबाग रायगड रा. सीगल रेसिडेन्सी, बिल्डींग नं. ६, खोली नं. २०२, गोंधळपाडा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड (वर्ग ३)) व सुजित श्याम पाटील (वय ३९, लिपिक, नेमणूक – कुरूळ ग्रामपंचायत अलिबाग रायगड रा. कुरूळ, ता. अलिबाग, जिल्हा रायगड (वर्ग ४)) या दोघांना पन्नास हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यांतील तक्रारदार यांचे मौजे कुरूळ गट क्रमांक ३४/४ या जागेवर स्वतंत्र घर बांधलेले आहे. सदर घरास घरपट्टी आकारून असेसमेंट उतारा मिळणेकरीता श्रीहरी खरात, ग्रामसेवक ग्रामपंचायत कुरूळ हे ५०,०००/- रूपये रुपये लाचेची मागणी करीत असलेबाबत तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणीच्या वेळी दि. १६/०८/२०२४ रोजी १५.३५ ते १६.४५ वाजण्याचे दरम्यान तक्रारदार यांचेकडे ग्रामपंचायत कार्यालय, कुरूळ येथे ५०,०००/- रूपये लाचेची मागणी करून, लाचेची रक्कम सुजित शाम पाटील, लिपिक, कुरूळ ग्रामपंचायत यांचेकडे देण्यास सांगितली. त्याप्रमाणे दिनांक २०/०८/२०२४ रोजी कुरूळ ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचला असता ग्रामसेवक खरात यांनी तक्रारदार यांचेकडे पूर्वी मागणी केल्याप्रमाणे रुपये ५०,०००/- लाचेची रक्कम लिपिक सुजित शाम पाटील यांचेकडे देण्यास सांगितली. त्याप्रमाणे सुजित पाटील यांना तक्रारदार यांचेकडून कुरूळ ग्रामपंचायत कार्यालय आवारात ५०,०००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारताना पंचासमक्ष १३.०५ वाजता रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाडावे, सहाय्यक फौजदार विनोद जाधव, सहाय्यक फौजदार अरूण करकरे, पोलिस हवालदार महेश पाटील, चालक पोलिस हवालदार सागर पाटील आदींच्या पथकाने यशस्वी करवाई केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!