मुशेत ग्रामस्थ व सक्षम एज्युकेशन सोसायटी यांचा संयुक्त उपक्रम
अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील मुशेत येथे गुरुवार, दि. १५ ऑगस्ट रोजी ज्ञानगंगा घरोघरी या योजनेअंतर्गत मुशेत ग्रामस्थ मंडळ आणि सक्षम एज्युकेशन सोसायटी चोंढी यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून सुमारे ११६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित पालक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधताना शार्दूल काठे यांनी आद्यक्रांती गुरु वस्ताद लहोजी साळवे यांचा जीवनपट सांगितला. यावेळी मुशेत गावचे पोलीस पाटील चंद्रशेखर सुर्वे, पांडुरंग सुर्वे, मंगेश सुतार, सचिन म्हात्रे, मनीष म्हात्रे, प्रितेश हडकर, अक्षय जाधव, परेश सुर्वे, सागर सातमकर, प्रणय निर्गुण, विक्रांत कदम, अमित मसुरकर, प्रीतम सुर्वे, सचिन सातमकर, रुपेश कदम, किरण फाटे, विशाल निर्गुण, सिल्केशा सुर्वे, प्रणाली सातमकर, मैथिली सुर्वे, साधना लोहार, प्रणिता सुर्वे, मानसी सुर्वे आदी ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे किसन गायकवाड, राम कदम, विशाल आमले, वासुदेव आमले यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर शैक्षणिक साहित्याचे वाटप मुशेत ग्रामस्थ यांच्या मदतीने करण्यात आले. अतिशय उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्र संचालन योगेश पवार यांनी केले.