• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

ByEditor

Aug 30, 2024

प्रतिनिधी
अलिबाग :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर अवजड वाहनांना बंदीच्या दृष्टीने दिनांक निहाय आदेश देण्यात आले आहेत. १६ टन व त्यापेक्षा अधिक वजन आहे अशा वाहनांना हे बंदी आदेश लागू राहतील. गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास, मुर्तीचे आगमन दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजेपासून ते दि. ८ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) वाहतुकीस पूर्णतः बंद राहील.

५ व ७ दिवसांच्या गणपतीचे विर्सजन, गौरी गणपती विसर्जन, काही अंशी परतीचा प्रवास – दि. ११ सप्टेंबर रोजी ८ वाजेपासून ते दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहील.

अनंत चुतर्दशी ११ दिवसांचे गणपती विसर्जन/परतीचा प्रवास – दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून ते दि. १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक,मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) वाहतुकीस पूर्णतः बंद राहील.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर संपूर्ण प्रवास बंदी असलेल्या कालावधी व्यतिरिक्त उर्वरित कालावधीत अशी वाहने, ज्यांची वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त आहे. (जड-अवजड, मल्टीएक्सल, ट्रेलर, ट्रक्स, लॉरी) अशा वाहनांना दि. ८ सप्टेंबर रोजी ११ वाजेपासून ते दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा.पर्यंत व दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून ते दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा. पर्यंत या वेळेत वाहतूकीस परवानगी राहील. तसेच सर्व वाहने दि. १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेनंतर नियमित प्रवास करतील.

वरील निर्बंध जेएनपीटी बंदर व जयगड बंदर येथून आयात निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने, तसेच दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या रस्ता रुंदीकरण, रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य, माल इ. ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!