विश्वास निकम
कोलाड : प्रोफेसर माधव आग्री यांना शनिवार, दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी अंधेरी Galexi Banquete येथे अतिशय नावाजलेल्या मान्यवरांच्या हस्ते वॉशिंग्टन विद्यापीठ-युनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका (USA) या शिक्षण क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात आले.
प्रो. डॉ. माधव आग्री रोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील रहिवाशी असुन ते सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देत असतात. याशिवाय कुणबी समाजाच्या हितासाठी अहोरात्र झटणारे एक आदर्श व्यक्तीमत्व आहेत. आपल्या विभागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी अशा विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन नेहमीच शैक्षणिक मदतीचा हात देत असतात. ते लायन्स क्लब कोलाड रोहाचे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत. अशा विविध स्तरावर काम करणारे माधव आग्री यांना गेल्या वर्षी राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाला असुन यावर्षीही त्यांच्या कार्याची दखल घेऊन वॉशिंग्टन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.
या यशाबद्दल प्रो. डॉ. माधव आग्री यांचे कुणबी समाजोन्नती संघ शाखा मुंबई, रायगड तसेच रोहा तालुक्यातील कुणबी समाजाचे पदाधिकारी व सर्व सदस्य, कोलाड रोहा लायन्स क्लबचे पदाधिकारी, सर्व सदस्य, सर्व तांबडी बुद्रुक ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.