नामदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सरपंच परशुराम म्हात्रे यांचा पक्षप्रवेश
विनायक पाटील
पेण : तालुक्यातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी ग्रामपंचायत म्हणजेच डोलवी ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांनी नामदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. अगोदरच पेण तालुक्यात भाजपचे कमळ फुलले असून त्यात आता डोलवी ग्रामपंचायतचा समावेश झाल्याने विरोधकांना काहीच पर्याय उरलेला नाही.
यावेळी डोलवी ग्रामपंचायत सरपंच परशुराम म्हात्रे यांनी बोलताना सांगितले की, मी आणि आमच्या सदस्यांनी खासदार धैर्यशीलदादा पाटील, आमदार रवीशेठ पाटील, भाजप जिल्हा चिटणीस मिलिंद पाटील, युवकांचे प्रेरणास्थान भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आम्ही हा पक्षप्रवेश केला आहे. डोलवी ग्रामपंचायतचा विकास आणि भाजप पक्ष वाढीसाठी मी नेहमीच प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.