• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ऐतिहासिक चिरनेर गावाला खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची भेट

ByEditor

Sep 11, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गावाला भिवंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बुधवारी (दि. ११) भेट देऊन आपल्या कुटुंबासह लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू श्री महागणपतीचे दर्शन घेतले. तसेच २५ सप्टेंबर १९३० सालच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले.

चिरनेर गावचे रहिवासी असलेल्या तथा ठाणे शहरातील उद्योजक अनिल मुंबईकर व त्यांच्या पत्नी साधना अनिल मुंबईकर यांनी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा तसेच शारदा सुरेश म्हात्रे यांचे स्वागत केले. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी आपल्या कुटुंबासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू श्री महागणपती चरणी विधीपूर्वक पूजा करुन श्री महागणपतीचे व स्वयंभू शिव मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेतले. तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले. याप्रसंगी उद्योजक अनिल मुंबईकर यांनी ऐतिहासिक चिरनेर गावाची माहिती खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना दिली. यावेळी चिरनेर गावचे उद्योजक राजाशेठ खारपाटील, सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचे चिरनेर नगरीत स्वागत केले. याप्रसंगी डॉ. राजेंद्र पाटील, पांडुरंग मुंबईकर, जनार्दन पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील यांच्यासह इतर मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!