मारहाण प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीला अटक
गणेश पवार
कर्जत : तालुक्यातील नेरळमध्ये भर रस्त्यात एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबीयांसमोरच बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. सदर व्हिडिओमधील व्यक्ती कारमध्ये बसला असून, रस्त्यावरील एक व्यक्ती हातात दंडुका घेऊन त्याला बेदम मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ समोर आला आहे. तर ठाकरे गटाच्या अधिकृत एक्स सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून, मारहाण करणारा व्यक्ती हा कर्जत-खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असल्याने व आमदार थोरवे यांनी त्यांच्यावरील करण्यात आलेल्या आरोपांचे केलेले खंडन या संदर्भात इलेक्ट्रॉनिक मीडियासह युट्यूब सोशल मिडियावरील प्रसिद्ध झालेल्या वृत्तांकनामुळे मात्र येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघासह राज्यातील राजकारण ढवळून निघाले असताना, सदर मारहाण प्रकरणी पिडित व्यक्तीने नेरळ पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली असल्याने नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन, सदर मारहाण करणाऱ्या आरोपीला नेरळ पोलीसांनी अटक केली आहे.
दि. ७ सप्टेंबर २०२४ रोजी नेरळमधील राजबाग या उच्चस्तरीय सोसायटी समोरील रस्त्यावर कारमध्ये बसलेल्या कुटुंबीयासहीत बसलेल्या एका व्यक्तीला रस्त्यावरील एक व्यक्ती हातात दंडुका घेऊन त्याला कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवून बेदम मारहाण करत असल्याची घटना घडली होती. नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील चिकनपाडा येथे दि. ८ सप्टेंबर २०२४ रोजी तिहेरी हत्याकांड झाल्याची घटना घडल्याने व या हृदयद्रावक घटनेमुळे कर्जत तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्र हदरला असताना, या तिहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात नेरळ पोलीस ठाण्यासह रायगड जिल्हा पोलीस यंत्रणा व्यस्त असताना सदर तिहेरी गुन्ह्याचा छ्डा अवघ्या ३६ तासात नेरळसह रायगड जिल्हा पोलीस यंत्रणेकडून लावून सदर गुन्ह्यातील आरोपी याला आटक केली. या तिहेरी हत्याकांड गुन्ह्यात पोलीस व्यस्त असताना, सदर मारहाण घटने संदर्भात फिर्यादी हा तक्रार देण्यासाठी नेरळ पोलीस ठाण्यात आला नसल्याने व सदर मारहाणीचा व्हिडिओ हा दि. ११ सप्टेंबर २०२४ रोजी व्हाट्सअप सोशल मिडिया तसेच ठाकरे गटाच्या अधिकृत एक्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने व ठाकरे गटाच्या अधिकृत एक्स सोशल मीडियावरील ‘मारहाण करणारा व्यक्ती हा कर्जत तालुक्याचे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचा व महाराष्ट्रात गुंडाराज ही कायद्याची चिंधड्या आणि लोकांचे हाल ही फक्त कर्जतच्या जनतेची अवस्था नाही तर संपूर्ण राज्यभरात गुंडगिरी वाढली आहे. याचे कारण गुंडांचा मेन बॉस बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय’ अशा शब्दात ठाकरे गटाने शिंदे गटावर टीका व गंभीर आरोप केले.
या संदर्भात इलेक्ट्रॉनिक मीडियासह युट्यूब सोशल मिडियावरील प्रसिद्ध झालेल्या वृत्तांकनामुळे या सर्व प्रकरणावर आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील इलेक्ट्रॉनिक मीडियासह युट्यूब सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत मारहाण करणारी व्यक्ती हा आपला बॉडीगार्ड असल्याच्या आरोपाचं खंडन करत या प्रकरणातील मारहाण करणारा व या प्रकरणात गंभीर जखमी झालेला हे दोघेही शिंदे गटाचे कार्यकर्ते असून, गंभीर जखमी हा माझा नातेवाईक असल्याचा अधिकृत खुलासा केल्याने मात्र येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघासह राज्यातील राजकारण ढवळून निघाले आले आहे.
सदर मारहाण प्रकरणी पिडित जखमी अमोल अरूण बांदल (वय २९, रा. बोरवाडी, पो. किरवली, ता. कर्जत, जि. रायगड) यांनी मारहाण करणारा शिवाजी उर्फ शिवा सोनावळे (रा. पिंपळोली, ता. कर्जत, जि. रायगड) याच्या विरोधात दि. ११ सप्टेंबर २०२४ नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानुसार गु. र. नं. १८७ / २०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८ (२), ३५२, ३५१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आसुन, सदर मारहाण प्रकरणातील आरोपीला नेरळ पोलीसांनी आटक केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा नेरळ पोलीस ठाण्याचे उप निरिक्षक दहातोंडे हे करीत आहेत. तर सदर अटक करण्यात आलेला आरोपी शिवाजी गोविंद सोनावळे हा एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे झालेल्या शिवसेना पक्ष फुटी दरम्यान उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी माथेरान शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक व पक्ष प्रतोद प्रसाद सावंत यांच्यावर बामनोली येथील कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील डी मार्ट येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील क्रमांक ३चा आरोपी असल्याने नेरळमध्ये भर रस्त्यात एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबीयांसमोरच बेदम मारहाण करणाऱ्या आरोपीचा व्हिडिओ व्हायरल करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर झालेले आरोप व आरोपाचे खंडन करताना आमदार थोरवे यांनी केलेला खुलासा पाहाता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व माहाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूकीत सदर मारहाण प्रकरण चर्चेचा मुद्दा की महायुतीची डोकेदुखी ठरणार याकडे मात्र कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघातील सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदर प्रकरणातील आटक करण्यात आलेल्या आरोपीचे व्हिडिओमधील मारतानाचे क्रूर दुश्य व त्याच्या विरोधात प्रसाद सावंत यांच्यावरील झालेल्या जीवघेणा हल्ल्या प्रकरणातील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यामधील नमुद नेरळ पोलीस ठाण्यात गु. र. नं. १९ / २०१९, भा. द. वि. सं. क. ३२४, ५०४, ५०६, ३४, खोपोली पोलीस ठाणे गु. र. नं. १५७ / २०१३, भा. द. वि. सं. क. ३८०, ४५४, ४५७, कर्जत पोलीस ठाणे गु. र. नं. १९० / २०१८, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३), नेरळ पोलीस ठाणे गु. र. नं. २२ / २०१९, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३), असे गुन्हे नोंद असल्याचे समोर येत असल्याने, मात्र मारहाण व्हिडिओतील अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपीच्या विरोधात न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
