साईनगर गणेशोत्सव मंडळाकडून विविध सामाजिक व करमणूकीच्या कार्यक्रमांचे आयोजन
मजिद हजिते
माणगाव : गेली २२ वर्षाची परंपरा असणारा व २३व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या माणगाव शहरातील सामजिक ऐक्य आणि विविधतेतुन एकता दाखविणाऱ्या या साईनगर रहिवासी मित्र मंडळाच्या प्रदर्शित करण्यात येणाऱ्या यावर्षीच्या चलचित्र देखाव्यात साईनगर रहिवासी मित्रमंडळ यांचा माणगावचा साईनगरचा राजा विराजमान झाला आहे. यावर्षी देखाव्यात समाजसेविका सुवर्णाताई जाधव यांच्या सहकार्यातुन श्री संत गोरोबा कुंभार यांची विठ्ठल भक्ती चलचित्र देखावा सादर करण्यात आला आहे. साईनगर मित्रमंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव माणगांव तालुक्यात नेहमीच समाजाप्रती आदर्श जपत विविध जनजागृतीच्या कार्यक्रमांनी साजरा होत असतो.
२०२४ या वर्षी देखील मंडळाकडून विविध करमणूक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये शैलेश दिवेकर, भालचंद्र खाडे, एस. जी. भोनकर पुरस्कृत शनिवारी शक्ती तुरा नाचाचे जंगी सामने व अंताक्षरी तसेच रविवारी साईसेवक संतोषभाई खडतर पुरस्कृत लहान गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा, सोमवारी खुला गट रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
एकीचे बळ दाखविणारे साईनगर मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य आणि त्यातूनच महत्वाचे म्हणजे देणगीदार यांच्या सहकार्याने यावर्षी २०२४ चा साईनगर माणगांवचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे. तर आपणही एक दिवस अवश्य भेट द्या, नवसाला पावणाऱ्या साईंनगरच्या राजाच्या दर्शनासाठी आणि मनमोहक चलचित्र पाहण्यासाठी असे आवाहन साईनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून करण्यात आले आहे.
