• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडजवळ कोंझर घाटात खाजगी बसला अपघात; बस ५० फूट दरीत कोसळली

ByEditor

Sep 15, 2024

मिलिंद माने
महाड :
नवी मुंबईच्या पर्यटकांना रायगडवर किल्ल्यावर घेऊन आलेली . खाजगी आराम बस रायगड किल्ल्याजवळील कोझर घाटात शेवटच्या वळणावर चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस 50 फूट खोल दरीत कोसळली मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही

नवी मुंबईतून छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड पाहण्यासाठी निघालेली खाजगी आराम बस रायगड जवळील कोंझर घाटात बस क्र. MH 04 JK 8382 ही घाटातील शेवटच्या वळणावरती चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने किमान 50 फूट खाली गेल्याने अपघात घडला आहे

रायगड किल्ला पाहण्यासाठी निघालेल्या बसमध्ये ४४ प्रवासी होते. सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. काही मोजक्या प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. रायगड किल्ला पाहण्यासाठी आलेल्या खाजगी आराम बसला अपघात झाल्यानंतर या बसमधील प्रवाशांना पुन्हा ऐरोली नवी मुंबई येथे जाण्यासाठी महाड एसटी आगाराकडून बस व्यवस्था करण्यात आली आहे.

रस्ते अपघाताला राष्ट्रीय महामार्ग रायगड प्राधिकरण जबाबदार!

रायगड किल्ला पाहण्यासाठी आलेल्या खाजगी बसला रायगड किल्ल्याजवळील कोझर घाटात अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी या रस्त्यावरील अपघाताला राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी जबाबदार असल्याची प्रतिक्रिया यावेळी तेथे उपस्थित असलेल्या असंख्य वाहन चालकांनी दिली. या मार्गावर अवघड वळणे व धोकादायक घाट असताना कोणत्याही ठिकाणी दिशादर्शक फलक अथवा रात्रीच्या वेळेस रेडियमच्या लाल रंगाच्या पट्ट्या व साईड पट्ट्या दिसण्यासाठी फ्लॅशर्स नसल्याने यापूर्वी देखील या रस्त्यावर असंख्य अपघात झाले आहेत. मात्र याचे काही देणेघेणे राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना नसल्याने आज झालेला अपघात हा अभियंता दिनी झाला, त्यामुळे महाड येथील राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरवले पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी स्थानिक नागरिकांकडून देण्यात आल्या या अपघाताची माहिती मिळतात महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार महेश शितोळे यांनी तातडीने दखल घेऊन योग्य ती मदत पुरवण्याचे काम केले. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सानप व महाड येथील अग्निशामक दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!