विश्वास निकम
कोलाड : सुदर्शन कंपनीमध्ये गोळीबार झाला होता, या गोळीबारात एका कामगाराच्या पायाला गोळी लागली होती. त्या कामगाराची दखल कोणी घेतली नव्हती. ते कामगार पाच वर्षांनी मला भेटले. मी माझ्या परीने त्यांना मदत केली. त्याची पोचपावती म्हणून गोरगरीब व कष्टकरी जनतेच्या आशिर्वादामुळेच मी खासदार होऊ शकलो असे मत खासदार धैर्यशील पाटील यांनी पुई येथील सत्कार समारंभात व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले कि, जी मला खासदारकी मिळाली आहे ती गोरगरीब व कष्टकरी जनतेची सेवा करण्यासाठी आहे. श्री क्षेत्रपाल मित्र मंडळाने मी खासदार झालो म्हणून सत्कार नाही केला त्यांच्या घरातील माणूस खासदार झाला म्हणून सत्कार केला. तसेच श्री क्षेत्रपाल मित्र मंडळ, पुई यांनी फार कमी वेळात कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे नियोजन केले आहे. त्यांना ही मनापासून धन्यवाद देतो.

यावेळी भाजपचे रायगड जिल्हा कार्यकारणी सदस्य सोपान जांबेकर, रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग, रोहा तालुका युवा मार्चाचे अध्यक्ष महेश ठाकूर, तंटामुक्ती अध्यक्ष राम खामकर, बबलु सय्यद, आहिरे सर, आनंद लाड, शिवराम महाबळे, मनोहर महाबळे, खांडेकर सर, गंगाराम दळवी, स्वप्नील सानप, पुई ग्रामपंचायत सदस्य अजित लहाने, सुजाता कदम, रोहा तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांचा सत्कार श्री क्षेत्रपाळ मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनंत सानप, मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल पवार, उपाध्यक्ष सचिन लहाने, सचिव हरिचंद्र कदम, खजिनदार मंगेश सानप, समीर पडवळ, डॉ. सागर सानप, दिनकर सानप, सचिन दिसले, विश्वास लहाने, अनिकेत शिर्के, अलोक दिवेकर, नरेश लहाने, लक्ष्मण पवार, मंगेश सानप, संदीप शिर्के यांनी केला. तसेच तंटामुक्ती अध्यक्ष राम खामकर आणि खामकर कुटुंब तसेच गंगाराम दळवी, ऋषिकेश दळवी व सुनिल दळवी यांनी खासदार धैर्यशील पाटील यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच उपस्थितांचे आभार डॉ. सागर सानप यांनी मानले.
