• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई सिनेट निवडणुका उद्याच होणार, मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

ByEditor

Sep 21, 2024

मुंबई : मुंबई सिनेटच्या निवडणुका उद्याच होणार असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मुंबई विद्यापीठाने सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाने मुंबई विद्यापीठाला फटकारले आहे. त्यामुळे सिनेटच्या निवडणुका उद्याच घ्यावा लागणार आहे. ठाकरे गटाच्या बाजुने कोर्टाने निकाल दिला आहे. ठाकरे गटाच्या वतीने सिद्धार्थ मेहता यांनी बाजु मांडली होती. त्यानंतर आता उद्याच निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

सिनेट निवडणूक मंगळवारी घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. उद्याच निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर एवढ्या अपुऱ्या वेळेत निवडणूक घेणे शक्य नसल्याचं विद्यापीठनं मत मांडले आहे. न्यायमूर्ती आशिष चांदोरकर यांच्या चेंबरमध्ये विद्यापीठाच्या वतीने हे मत मांडण्यात आलं आहे.

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित केल्यानंतर ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे आता रविवारी 22 सप्टेंबरलाच मुंबई विद्यापीठाची निवडणूक होणार आहे. मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढत निवडणुका पुढे ढकल्याचा निर्णय़ घेतला होता. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. महाराष्ट्राने एवढे घाबरट, गद्दार मुख्यमंत्री याआधी कधीही पाहिलेले नाहीत, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!