• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये विद्यार्थी सुरक्षा जागरूकता शिबिराचे आयोजन

ByEditor

Sep 24, 2024

विनायक पाटील
पेण :
दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.३० ते १ या कालावधीत न्हावाशेवा पोलिस विभाग व चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया यांच्या वतीने जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय, शेव, उरण या शाळेमधील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता होणाऱ्या अत्याचारांपासून संरक्षण याविषयी “विद्यार्थी सुरक्षा जागरूकता” शिबिराचे आयोजन सीएफआय संस्थेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख व न्हावाशेवा पोलिस ठाण्याचे सिनिअर पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी सुमारे १३०० विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शाळेचे मुख्यापक व ४० ते ४५ शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

या शिबिरादरम्यान उपस्थित असलेल्या सीएफआय संस्थेच्या प्रोग्राम मॅनेजर अक्षता सावंत व सोशल वर्कर पूजा वाडेकर यांनी विद्यार्थी विद्यार्थीनीना चांगला व वाईट स्पर्श, तो कसा ओळखावा व कोणी वाईट स्पर्श केल्यास त्यातून कशी सुटका करावी व ते लपवून न ठेवता शिक्षक अथवा आई वडिलांना विश्वासात घेऊन सांगावे याबद्दल मार्गदर्शन केले.

सदर शिबिरामध्ये विद्यार्थी व विद्यार्थीनीना पीओसीएसओ कायद्याविषयी अॅड. शैलेश कोंडुसकर व अॅड. विवेक गोपी यांनी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पोलिस विभागाचे पीएसआय शांताराम लेंडे व हवालदार कनिष्का नाईक यांनी सायबर गुन्हे, डायल ११२, निर्भया पथक महिला सहाय्यक कक्ष व महिलांच्या सुरक्षा संदर्भात तसेच धोकादायक प्रसंगापासून आपली सुटका कशी करावी, धोकादायक प्रसंग कसे ओळखावे तसेच सायबर क्राइम कसे होतात ते झाल्यावर काय करावे आणि आपल्या आजूबाजूला होणार्या एखाद्या वाईट घटनेविषयी सतर्कता दाखवून पोलिसांना कोणत्या क्रमांकावर संपर्क साधावा या विषयी मार्गदर्शन केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!