• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांचा मेळावा संपन्न

ByEditor

Oct 4, 2024

घन:श्याम कडू
उरण :
विधानसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना नवीन शेवा शाखेच्या शिवसैनिकांचा मेळावा शिवसेना ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा उरण मतदारसंघाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. 2 ऑक्टोबर 2024 रोजी संपन्न झाला. या मेळाव्यात महाविकास आघाडीचे उमेदवार यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला.

सदर मेळाव्यास उरणचे माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, विधी व न्याय सेल विधानसभा अध्यक्ष संतोष खांडेकर, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, तालुका संपर्कप्रमुख दीपक भोईर, उप तालुकाप्रमुख कमलाकर पाटील, उप तालुका संघटक के. एम. घरत, द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, शहर संघटक किसन म्हात्रे, महेश वर्तक, शाखाप्रमुख शैलेश भोईर, माजी शाखाप्रमुख दिनेश घरत, निलेश घरत, ग्रामपंचायत सदस्य कुंदन भोईर, सतीश सुतार, भूपेंद्र पाटील, अशोक दरणे, कामगार नेते गणेश घरत, लक्ष्मण म्हात्रे, पंकज सुतार, उपशाखाप्रमुख अशोक म्हात्रे, सुरेश पाटील, शेखर पडते, मनोज घरत, दिलीप घरत व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!