मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेची आचारसंहिता लागायला काही तास बाकी असताना महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न निकाली काढलेला आहे. महायुतीचे राज्यपाल नियुक्त 7 आमदार ठरल्याचे समजत आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रसने आपल्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवाडी यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि मुखेडचे विद्यमान आमदार तुषार राठोड यांना संधी देण्यात आली आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाकडून मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील यांना संधी देण्यात आली आहे.