विनायक पाटील
पेण : डॉ. पतंगराव कदम कला व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी गणपती मूर्ती निर्मिती कारखान्याला भेट दिली.
पेण हे शहर गणपती निर्मिती कलाकेंद्र म्हणून ओळखले जाते. महात्मा गांधी यांनी मुलोद्योगी शिक्षणाचा विचार मांडला आहे. त्याच विचाराची पुढील पायरी राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विदयार्थ्यांमधील कौश्यल्य विकास महत्वाचा आहे. निव्वळ पुस्तकी माहितीपेक्षा अनुभवजण्य ज्ञान महत्वाचे आहे. यानुसार वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेटीतून अनुभव घेतला. महावीद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुरलीधर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्थळ भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

या भेटी दरम्यान मुलांनी प्रत्यक्ष मूर्ती निर्मिती, रंगकाम, वाहतूक व्यवस्था, विक्री व्यवस्था इ. ची माहिती जाणून घेतली. दीपक कला केंद्र आणि गणपती उत्पादन केंद्र पेणचे मालक सचिन समेळ यांनी विद्यार्थ्यांना सखोल माहिती पुरविली. यात वाणिज्य शाखेचे 60 विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. मुरलीधर वाघ यांच्यासह प्रा.संतोष गुरव, प्रा. डॉ.अमुकसिद्ध पुजारी, प्रा.लक्ष्मण कुमारे यांनी परिश्रम घेतले. यात विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण वातावरनात आनंदाने सहभाग घेतला.