प्रतिनिधी
नागोठणे : येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान महाविद्यालयातर्फे मतदार जनजागृती करण्यासाठी जोगेश्वरी नगर परिसरात रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली.

पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व जनतेने भयमुक्त वातावरणात निवडणुकीत सहभागी व्हावे म्हणून मतदार घोषवाक्याद्वारे जनजागृती अभियान राबविण्यात आले. या रॅलीचे आयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना व निरंतर व विस्तार विभागातर्फे राबविण्यात आले. यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रीकृष्ण तुपारे व डॉ. मनोहर शिरसाठ, निरंतर व विस्तार कार्यप्रमुख डॉ. राणी ठाकरे यांनी मेहनत घेतली. या प्रसंगी आय. क्यू. ए. सी. प्रमुख डॉ. संदेश गुरव, वनस्पती विभाग प्रमुख डॉ. विजय चव्हाण, सांस्कृतिक विभाग प्रमुख जयेश पाटील यांच्यासह ७६ विद्यार्थी सहभागी झाले होते.