• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! बाबुशेठ खानविलकरांचा तडकाफडकी राजीनामा

ByEditor

Oct 22, 2024

खा. सुनील तटकरेंचे विश्वासू निकटवर्तीय सहकारी

सलीम शेख
माणगाव :
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बाबुशेठ खानविलकर यांनी आपल्या पदाचा व सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन दिला. जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील हे बाहेरगावी गेल्याने त्यांचे चिरंजीव अमित पाटील यांच्याकडे तो लेखी स्वरूपात राजीनामा सुपुर्द केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांचे बाबुशेठ खानविलकर हे निकटवर्तीय विश्वासू सहकारी होते.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबुशेठ खानविलकर यांनी आपल्या पदाचा व सदस्याचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडणार आहे. बाबुशेठ खानविलकर हे गेले काही दिवसांपासून महाड विधानसभा मतदारसंघाच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. सध्या महाड विधानसभा मतदार संघातील माणगाव तालुक्यातील निजामपूर भागातीलच नव्हे तर महाड पोलादपूर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांचा या भागात दांडगा संपर्क आहे. पक्षातील कार्यकर्त्याबरोबरच अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनाही विश्वासात घेऊन काम करणारा हा जनमाणसातील नेता म्हणून बाबू खानविलकर यांची ओळख आहे. त्यांच्या राजीनामा नंतर निजामपूर भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नजीकच्या काळात आपले राजीनामे पक्षश्रेष्ठीकडे देणार असल्याचे खात्री लायक चर्चा आहे त्यामुळे निजामपूर भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का आहे.

या राजीनामा पत्रात श्री. खानविलकर यांनी म्हटले आहे की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निजामपूर विभाग अध्यक्ष पदापासून ते विधानसभा अध्यक्ष पदापर्यतचा पक्षाचे काम पक्षश्रेष्ठीच्या आदेशाचे पालन करुन प्रमाणिकपणे काम केले आहे. माझी पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्यावर किंवा नेत्यांवर नाराजी नाही. परंतु मला समजल्यानुसार महाड-माणगाव-पोलादपुर विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना या पक्षाला युतीमध्ये उमेदवारी देण्यात आल्यामुळे सदर विधानसभेची उमेदवारी आमदार भरतशेठ गोगावले यांना मिळाली आहे. सदर उमेदवाराचे काम करण्याची मानसिकता माझी होत नसल्यामुळे मी माझ्या विधानसभा अध्यक्ष पदाचा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.

बाबुशेठ खानविलकर यांच्या राजीनाम्याने महाड माणगाव पोलादपूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आ. भरत गोगावले यांना मोठा धक्का बसणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!