पालकांनी मानले सीएफआय संस्थेचे आभार
विनायक पाटील
पेण : दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुलांची दिवाळी आनंदात जावी यासाठी यावर्षी देखील चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया या संस्थेने एकूण २६५० प्रतिपालीत व अप्रतीपालीत मुलांना दिवाळी गिफ्टचे वाटप सीएफआय संस्थेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांच्या हस्ते उत्कर्षनगर येथील कार्यालयात करण्यात आले. यामध्ये मोती साबण, कंदील, रांगोळी, खाऊ तसेच दिवाळीच्या सुट्टीमध्ये खेळण्यासाठी सापशिडी, कॅरम, क्रिकेट साहित्य, बॅडमिंटन इत्यादी वस्तू भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी सीएफआय संस्थेचे सोशल वर्कर मुलांना भेट देण्यासाठी उपस्थित होते. तसेच या मुलांसोबत मोठ्या संख्येने पालकवर्गही उपस्थित होता व भेट मिळाली त्यासाठी मुले व पालक आनंदीही होते. हा आनंद देण्यासाठी दिवाळी गिफ्ट मिळाल्याबद्दल चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया या संस्थेचे पालकवर्गाने आभार मानले.