सलीम शेख
माणगाव : पुणे दिघी मार्गावरील निजामपूर रोडवर मौजे पाणोसे गावच्या हद्दीत मोटारसायकल व पिकअपमध्ये अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. च्या सुमारास मयत उमेश सारखले (वय ४७, रा. पाली) हे त्यांचे ताब्यातील बजाज प्लॅटिना मोटारसायकल क्र. एमएच ०६ बीसी ८९१८ हि पाली वरून निजामपुर ते माणगांव अशी चालवित घेवुन जात असताना, मौजे पाणोसे गावचे हद्दीत नागमोडी वळणाचे रस्त्यावर आले असता समोरुन येणाऱ्या पिकअप क्र. एमएच १२ व्हीएफ ६९७४ वरील चालकाने त्यांचे ताब्यातील वाहन हे अतिवेगाने, बेदरकारपणे, हयगयीने, रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन चालवुन यांतील मयत यांस विरुद्ध दिशेला येऊन ठोकर मारुन अपघात केला. या अपघातात सारखले यांचे डोक्याला समोरील उजवे भागास व दोन्ही हाताला गंभीर दुखापत होवुन त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. ई. चव्हाण करीत आहेत.