• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्ह्यामध्ये ३,३९८ भावी शिक्षक देणार पात्रता परिक्षा

ByEditor

Oct 29, 2024

प्रतिनिधी
रायगड :
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत दिनांक १० नोव्हेंबर, २०२४ रोजी शिक्षक पात्रता परिक्षा जिल्हयातील ३ केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परिक्षेच्या आयोजनासाठी दिनांक २४/१०/२०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपाध्यक्ष जिल्हा आयोजन व सनियंत्रण समिती, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२४ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या समितीच्या सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राय), रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी परिक्षेची बैठक व्यवस्था पोलिस बंदोबस्त, कस्टडी रुम (प्रश्न पत्रिका, उत्तर पत्रिका व स्वाक्षरीपट ठेवण्यासाठी) जिल्हा नियंत्रण कक्ष, परीक्षा केंद्र, अधिकारी, कर्मचारी नेमणुका, वाहन व्यवस्था, व्हिडीओ चित्रीकरण, व भरारी पथक यांना याबाबत माहिती दिली.

सदर परिक्षा ही पनवेल शहरातील १) के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालय, सेक्टर १८, सिडको कॉलनी, नवीन पनवेल येथे सकाळ सत्र स.१०.३० ते दु.१.०० या कालावधीत पेपर -1 साठी ६८२ परिक्षार्थी व दुपार सत्र दु. २.३० ते ५.०० या कालावधीत पेपर-II साठी ६८२ परिक्षार्थी २) सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माध्यमिक, सेक्टर १ ई. सिडको कॉलनी, कळंबोली मॅकडोनाल्डच्या पाठीमागे, पनवेल येथे सकाळ सत्र स.१०.३० ते दु.१.०० या कालावधीत पेपर 1 साठी ७६० परिक्षार्थी व दुपार सत्र दु. २.३० ते ५.०० या कालावधीत पेपर -11 साठी ८६५ परिक्षार्थी ३) चांगु काना ठाकुर विद्यालय, जनार्दन भगत मार्ग प्लॉट न.८ सेक्टर- १४, सिडको कॉलनी, नवीन पनवेल येथे दुपार सत्र दु.२.३० ते ५.०० या कालावधीत पेपर -11 साठी ४०९ परिक्षार्थी असे एकुण ३,३९८ परिक्षार्थी परिक्षा देणार आहेत.

या परिक्षेसाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक व योजना) व शिक्षणाधिकारी, पनवेल महानगर पालिका पनवेल यांची भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. असे पुनिता गुरव,सदस्य सचिव, जिल्हा परीक्षा आयोजन व संनियंत्रण समिती तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रायगड जिल्हा परिषद, अलिबाग, यांनी कळविले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!