सोमवार, ११ नोव्हेंबर २०२४
मेष राशी
असुरक्षितता अथवा आत्मविस्मृतीच्या भावनेमुळे चक्कर येईल. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. जुने संबंध, ओळखी आणि मित्रांची मदत होईल. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी अतिभावूक बोलू नका. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते, त्यांच्या कारकीर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उतरंड सुरू होईल. आपल्या कुठल्या मित्रांसोबत आज वेळ घालवू शकतात परंतु, या वेळी तुम्ही मद्यपान करू नका अथवा वेळ व्यर्थ होईल. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईझ देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल.
भाग्यांक :- 1
वृषभ राशी
प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेतात तर, अश्या लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूम मध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकतात. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, असं का म्हणतात, ते तुम्हाला आज कळेल.
भाग्यांक :- 1
मिथुन राशी
आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाऊंट मध्ये पैसे टाकू शकतो हे पाहून तुम्हाला आनंद ही होईल आणि आश्चर्य वाटेल. कुटुंबातील स्थिती आज तशी राहणार नाही जसा तुम्ही विचार करत आहे. आज घरात कुठल्या गोष्टीला घेऊन कलह होण्याची शक्यता आहे अश्या स्थितीमध्ये स्वतःला काबूत ठेवा. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल आज तुमच्या कष्टाचे चीज होईल. संद्याकाळची वेळ चांगली राहण्यासाठी तुम्हाला दिवसभर मन लावून काम करण्याची आवश्यकता आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे.
भाग्यांक :- 8
कर्क राशी
कलात्मक काम तुम्हाला आराम मिळवून देईल. आज कुणी विपरीत लिंगीच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा – मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागेल – जे वचन तुम्ही पूर्ण करू शकणार नाही ते देऊ नका. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. विद्यार्थी-विद्यार्थिनींना आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. तुम्हाला जेव्हा ही रिकामा वेळ मिळेल आपले काम पूर्ण करा. असे करणे तुमच्यासाठी हिताचे आहे. आज तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दु:खद आठवणी विसरून जाल आणि वर्तमानकाळ साजरा कराल.
भाग्यांक :- 2
सिंह राशी
आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. कार्यालयीन काम फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम शंभर टक्क सहकार्य तुम्हाला मिळेल. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुस-यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. अलीकडच्या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार फार आनंदी नसाल, पण आज मात्र तुम्ही खूप धमाल करणार आहात.
भाग्यांक :- 1
कन्या राशी
आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल परंतु, संध्याकाळी तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. जे आपली परिस्थिती समजू शकतात आणि गरज ओळखू शकतात अशा जवळच्या मित्राबरोबर बाहेर फिरायला जा. कोणीतरी फ्लर्ट करण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही. आज तुमच्या मनात काही दुविधा येतील जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही. तुमचा जोडीदार तुमच्या कडून थोडा वेळ मागतो परंतु, तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही त्यामुळे ते नाराज होतात. आज त्यांची ही खिन्नता स्पष्टतेने समोर येऊ शकते. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल.
भाग्यांक :- 8
तुळ राशी
असुरक्षितता अथवा आत्मविस्मृतीच्या भावनेमुळे चक्कर येईल. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल परंतु, आधी केलेल्या व्यर्थ खर्चाच्या कारणाने त्यांच्या जवळ पर्याप्त धन नसेल. मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. प्रेम अमर्याद असते, असीम असते; हे तुम्ही या पूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. ऑफिस मध्ये आज तुम्हाला स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका. जबरदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकतात. टीव्ही, मोबाइलचा वापर चुकीचा नाही परंतु, आवश्यकतेपेक्षा अधिक याचा उपयोग करणे तुमच्या गरजेचा वेळ खराब करू शकते. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते, पण आता तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे.
भाग्यांक :- 1
वृश्चिक राशी
तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे – परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. अनोळखी कुणी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला सामान खरेदी करावे लागू शकते जे तुम्ही पुढील महिन्यात खरेदी करणार होते. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची मुले सर्वतोपरीने प्रयत्न करतील. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्त्रोत आहे याचा अनुभव मिळेल. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दुरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचे ही असेल. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असे दिसते.
भाग्यांक :- 3
धनु राशी
तुमच्यातील उच्च आत्मविश्वास आज चांगल्या कामासाठी वापरा. धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. मुलांसोबत वेळ घालवण्याची गरज आहे आणि त्यांना काही चांगली मूल्ये आणि त्यांच्या जबाबदा-या याविषयी काही सांगण्याची गरज आहे. सायंकाळच्या छेडछाडीत आनंद घेऊ नका. कामकाजाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढविण्यासाठी कौशल्य स्तर वाढवा. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमचे वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे शेजारी तुमचे कुटुंबिय आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवतील.
भाग्यांक :- 9
मकर राशी
तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आज तुम्ही घरातून बाहेर खूप सकारात्मकतेने निघाल परंतु, कुठल्या किमती वस्तूची चोरी होण्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो. काही लोक जरूरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील – परंतु केवळ गप्पा करणाºया लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. तुमचे डोळे इतके पाणीदार व तेजस्वी आहेत की तुमच्या प्रिय व्यक्तीची अख्खी रात्र त्यात उजळून जाईल. आपल्या भागीदारांना गृहीत धरू नका. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.
भाग्यांक :- 9
कुंभ राशी
अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. या राशीतील व्यावसायिक आज कुणी जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे समस्येत येऊ शकतात. जॉब करणाऱ्या जातकांना आज कार्य-क्षेत्रात विचार करून चालण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. तुमच्या जोडीदाराचा आज तुम्हाला त्रास होईल.
भाग्यांक :- 7
मीन राशी
तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे तर, आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभ ही होऊ शकतो. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यात नातेवाईक पुढाकार घेतील. पवित्र आणि ख-या प्रेमाचा अनुभव येईल. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल तोपर्यंत कोणताही वायदा करू नका. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल.
भाग्यांक :- 5