• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत सागर कांबळे क्रिकेट अकॅडमी अंतिम विजयी

ByEditor

Dec 6, 2024

क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग :
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सोळा वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत पनवेलच्या सागर कांबळे क्रिकेट अकॅडमी संघाने एसबीसी महाड संघावर ८ गडी राखून विजय मिळवला आहे.

गुरुवार, दि. ५ डिसेंबर रोजी पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर स्पर्धेचा अंतिम सामना सागर कांबळे क्रिकेट अकॅडमी पनवेल विरूद्ध एसबीसी महाड संघामध्ये खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम महाडच्या संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण पनवेल संघानी दिले. महाड संघाने ३४ षटकांमध्ये सर्व गडी गमावत ११२ धावसंख्या उभारली. मधल्या फळीत प्रथमेश मोरे ३३ व जुनेद खान यांनी २० धावा काढल्या. पनवेल संघाच्या प्रतीक बोटे याने आपल्या भेदक गोलंदाने महाडचा अर्धा संघ तंबूत धाडला. त्याने ५ गडी बाद केले तर हिमांक धोका ३ रुद्र खोपकर यांनी २ फलंदाज बाद केले.

प्रतिउत्तर देताना सागर कांबळे क्रिकेट अकॅडमी संघानी २४व्या षटकात दोन गडी गमावत ११२ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. ओम साळुंके ५१ व तेजस गिलबिले यांनी नाबाद २९ धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. महाडच्या संघाकडून आमन पठाण व वत्सल मोरे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. संपुर्ण स्पर्धेत एकूण २८ संघांनी सहभाग घेतला होता. प्रथम साखळी व नंतर बाद फेरीनुसार स्पर्धेत ४८ एकदिवसीय सामने यशसवीरित्या पार पडले. अंतिम सामन्यासाठी प्रमूख अतिथी म्हणून आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, खजिनदार प्रशांत ओक, सहसचिव जयंत नाईक, सदस्य ॲड. पंकज पंडित, प्रदिप खलाटे, सामना अधिकारी सुरेश म्हात्रे, एजाज मारूफ, सागर मुळे, आदेश नाईक, विघ्नहर्ता मुंढे, शेखर भगत, पनवेल संघाचे प्रशिक्षक सागर कांबळे, विकास पवार, रोहित कार्लेकर, महाडचे प्रशिक्षक आवेश चिचकर यांच्यासह दोन्ही संघाचे खेळाडू, क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!