• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सिडकोच्या द्रोणागिरी नोड येथील गृहनिर्माण संकुलात अनधिकृत पार्किंग, रहिवाशांची कारवाईची मागणी

ByEditor

Dec 7, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
सिडकोच्या द्रोणागिरी नोड येथील गृहनिर्माण संकुलात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पार्किंग होताना दिसते. राजरोसपणे येथे शेकडो वाहने उभी केली जात आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या वाहनांवर कारवाई व्हावी अशी मागणी रहिवाशांकडून जोर धरत आहे. दरम्यान, अनधिकृतरित्या पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई केल्यानंतर ती वाहने ठेवण्यास उरण वाहतूक शाखेकडे मैदानच उपलब्ध नसल्याने कारवाई बारगळल्याची माहिती समोर येत आहे.

नवीमुंबई शहराला पर्याय उपलब्ध होण्यासाठी सिडकोने उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड ( सेक्टर १२) येथील जेएनपीए बंदराच्या व नवघर ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे स्टेशन जवळ गुह संकुल्प उभारले आहे. मात्र रहिवाशांच्या गुहसंकुलातील रहिवाशांच्या रहदारीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मालाची आयात – निर्यात करणारी अवजड वाहने ही रात्री अपरात्री अवैधरित्या पार्किंग करुन ठेवत आहेत. त्यामुळे जेएनपीए बंदर वसाहती जवळील रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तसेच गुहसंकुलातील रस्त्यावर वाहनांची अनधिकृत पार्किंग होते असल्याने त्याचा त्रास हा संकुलातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. तरी वाहतूक शाखेच्या पथकाने सदर अनाधिकृत पार्किंगवर कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

सिडकोने द्रोणागिरी नोड येथील जेएनपीए बंदराच्या वसाहती जवळ गृहनिर्माण संकुलाची उभारणी केली आहे. या संकुलात मोठ्या प्रमाणात रहिवासी राहत आहेत. मात्र रहिवाशांच्या रहदारीच्या रस्त्यावर बेशिस्त अवजड वाहने रात्री अपरात्री अवैधरित्या पार्किंग करुन ठेवण्यात येत असल्याने त्यांचा त्रास हा रहिवाशांना, विद्यार्थी,नोकरदार वर्गाला सहन करावा लागत आहे.तरी वाहतूक शाखेच्या पथकाने सदर अनाधिकृत पार्किंगवर कारवाई करावी.
-मधुकर तांडेल,
रहिवासी, गृहसंकुल

आम्ही वाहन चालक हे गृहसंकुलात वास्तव्य करत असल्याने आपली वाहने घरी आल्यावर घेऊन येत आहोत आणि ती वाहने रस्त्यावर पार्किंग करुन ठेवत आहोत. त्याचा त्रास रहिवाशांना होतो की नाही हे आम्हाला माहीत नाही.
-हरभजन सिंग
वाहनचालक

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!