विनायक पाटील
पेण : तालुक्यातील खरोशी येथे डाॅ. सुहास हळदीपुरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल पनवेल आणि ग्रामपंचायत खरोशी व ग्रामस्थ मंडळ खरोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आज ८ डिसेंबर मोफत नेत्र तपासणी व मोफत ऑपरेशन शिबिर राबविण्यात आले. 70 लोकांनी शिबिराचा लाभ घेतला तसेच 18 लोकांना मोतीबिंदू असल्याचे मशीनद्वारे तपासणी केल्यानंतर निदर्शनास आले. त्यामधून 13 लोकांना आज लगेच पनवेल हळदीपूरकर हॉस्पिटल पनवेल येथे ऑपरेशनसाठी नेण्यात आले आहे.

या शिबिरासाठी डॉ. मृण्मयी वैद्य, प्रशांत गायकवाड, पायल पाटील, भूषण रंगारी, जयप्रकाश यादव, सरपंच रूपाली पाटील, महेश पाटील तसेच हसुराम कृष्णा पाटील, प्रणय हरिभाऊ पाटील, मंजुळा माळी, जितेश पाटील आदि ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.