• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बोर्लीच्या उमेरचा प्रामाणिकपणा; हरवलेलं सोन्याचं ब्रेसलेट मालकाकडे केले सुपूर्द

ByEditor

Dec 14, 2024

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहरात वांजळे रस्त्यात प्रवासा दरम्यान हरवलेल लाखो रुपयाचं सोन्याचं ब्रेसलेट प्रामाणिकपणे परत देण्याची घटना शुक्रवारी घडली आहे. सापडलेले वस्तू प्रामाणिकपणे देण्याचं प्रयत्न करणाऱ्या उमेर जंजिरकर याच सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

बोर्लीपंचतन येथील नितेश मुद्राळे आपल्या घरी जात येत असताना वांजळे या रस्त्यावर त्यांच्या हातातील सोन्याच ब्रेसलेट जवळ जवळ एक लाख पंचवीस हजार या किमतीचे हातातून निसटून पडून गेले. त्यानंतर याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रेसलेट मालक मुद्राळे यांच्याकडून वस्तू हरवलेली आहे असे आवाहन करण्यात आले. तरी त्यांना हरविलेली ब्रेसलेट मिळणे हे तसे अवघडच; मात्र उमेर जंजिरकर याच्या प्रामाणिकपणामुळे एवढ्या मोठ्या किंमतीचे वस्तू परत मिळाली.

उमेर याला ब्रेसलेट मिळाल्यानंतर सोने दुकानदार किरण तळकर यांच्याशी संपर्क करून त्याने वस्तू सोन्याची असेल तर बघा व ज्याची असेल त्याला मिळावी यासाठी विनंती केली. शेवटी सोशल मीडियाच्या आधारे माणसातील माणुसकी जागी झाली. मुद्राळे यांना संपर्क साधून ब्रेसलेट त्यांना सुपूर्द करण्यात आले. वस्तू परत मिळाल्यावर मुद्राळे यांनी सर्वांचे आभार मानून प्रामाणिकपणे वस्तू परत करणारे उमेर जंजिरकर याला पाच हजार रुपयांचे रक्कम स्वरूपात बक्षीस दिले. त्याचवेळी नंदू भाटकर, शंकर गाणेकर, पिंट्या पडवेकर यांच्याकडून कौतुक करण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!