• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आंबेवाडी येथे विजेचा शॉक लागून इसमाचा मृत्यू

ByEditor

Dec 16, 2024

विश्वास निकम
कोलाड :
रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील गणेश नगर येथे रविवार, दि. १५/१२/२०२४ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास बाळाराम सखाराम तेलंगे वय वर्षे ५३ राहणार हेटवणे याचा विजेचा शॉक लागून मृत्यु झाल्याची घटना घडली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोलाड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, दि. १५/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ४ वाजता आंबेवाडी येथील गणेशनगर येथे बाळाराम सखाराम तेलंगे, रा. हेटवणे हा वेली काढण्यासाठी पोलावर चढला असता त्याला विजेचा शॉक लागल्याने तो खाली पडला. त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी येथे आणण्यात आले. येथील डॉक्टरांनी तपासले असता त्याला मयत घोषित केले. कोलाड पोलिस ठाण्यात त्यांच्या मृत्युची नोंद १७/२०२४ बीएनएसएस १९४ प्रमाणे करण्यात आली आहे.

घटनास्थळी कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांनी जाऊन याविषयी पंचनामा केला असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलिस ठाण्याचे अंमलदार एस. जी. मोरे अधिक तपास करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!