• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जिते येथे वीरांगणी झाशीची राणी लक्ष्मीबाई संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

ByEditor

Dec 16, 2024

विनायक पाटील
पेण :
पेण तालुका शिक्षक सेल अध्यक्ष तथा जिते विरांगणी झाशीची राणी लक्ष्मीबाई संघटना अध्यक्ष संस्थापक नथुराम सर यांच्या विशेष सहकार्याने दुर्बल घटक तसेच अपंग मुला मुलींना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम दुष्मी खारपाडा माजी सरपंच तथा कै. मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा रश्मी दयानंद भगत यांच्या हस्ते संपन्न झाला.

व्यासपीठावर प्रमुख पाहुणे पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दयानंद भगत, जिते पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष धर्मेंद्र म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी प्रमुख पुष्पलता नरेंद्र ठाकूर, बालगंगा विद्या मंदिर चुनाभट्टी जिते मुख्याध्यापिका वर्तक मॅडम, बळीराम पाटील, भूषण म्हात्रे, कमलाकर भोईर, लक्ष्मण पाटील, दत्तात्रय ठाकूर, दशरथ म्हात्रे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी 80 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला पालकवर्ग व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!