सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील मुगवली येथील एका अल्पवयीन १६ वर्षीय मुलीला अज्ञात आरोपी इसमाने फूस लावून कोठेतरी पळवून नेल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना शुक्रवार, दि. २१ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या मुगवली येथील राहते घरातून घडली आहे. याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील फिर्यादी यांची नात १६ वर्ष ४ महिने वयाची अपरहित पीडित मुलगी तिचे वर्णन उंची अंदाजे ५ फूट, रंग निमगोरा, अंगाने मध्यम , केस काळे लांब, अंगात नेसूस राखाडी रंगाची जीन्स पॅन्ट व पांढऱ्या रंगाचा टीशर्ट, पायात निळ्या रंगाची सॅंडल, कपाळावर गोल ठिपका गोंदवलेला हिला कोणत्यातरी अज्ञात इसमाने फूस लावून कोठेतरी पळवून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गुन्हा. रजि.नं. २५२/२०२३ भादंवि संहिता कलम ३६३ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. गायकवाड हे करीत आहेत.