• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नीलम गोऱ्हे शिवसेना सोडणार? राजकीय भूकंपाचे संकेत

ByEditor

Dec 19, 2024

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये जाण्याची शक्यता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केल्या आहेत. सत्ता माणसाला किती लाचार आणि प्रवाहपतीत करते, अशी टीका अंधारेंनी केली. नीलम गोऱ्हेंना सभापतीपदी संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु त्या जागी भाजपने राम शिंदे यांना सभापती केले. या पार्श्वभूमीवर अंधारेंनी सूचक ट्वीट केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज नागपुरातील रेशीमबागेत भाजप आणि मित्रपक्षांच्या आमदारांचे बौद्धिक घेतले. यावेळी शिवसेनेच्या विधानपरिषद आमदार-उपसभापती या नात्याने नीलम गोऱ्हेंनीही हजेरी लावली. यावरुन गोऱ्हेंची राजकीय कारकीर्द सांगत अंधारेंनी त्यांना ‘एक्स’ सोशल मीडियावर ट्विट करत टोला लगावला आहे.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

“संघ मुख्यालयात गेलेल्या नीलम गोरेंना जन्मभूमीत गेल्यासारखे वाटले म्हणे! अंगात कर्तृत्व नसेल आणि चापलुसीने काही मिळवण्याची धडपड असेल तर सत्ता माणसाला किती लाचार आणि प्रवाहपतीत करते याचे उत्तम उदाहरण नीलम गोरे आहेत! आधी भारीप मग राष्ट्रवादी मग शिवसेना मग शिंदे गट आता भाजपची वाट!!!” असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!