• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन प्रशिक्षक कमिटीच्या अध्यक्षपदी शंकर दळवी यांची नियुक्ती

ByEditor

Dec 19, 2024

क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग :
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे रायगड जिल्ह्यातील सर्व मुला-मुलींच्या सर्व वयोगटातील व खुल्या गटातील खेळाडूंच्या क्रिकेट प्रशिक्षणाची सर्व जबाबदारी शंकर दळवी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिशनच्या कार्यकारणीच्या सभेमध्ये शंकर दळवी यांची प्रशिक्षक कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

शंकर दळवी हे लेव्हल १ प्रशिक्षक म्हणून प्रमाणित आहेत. जिल्हाच्या क्रिकेट संघात दीर्घकाळ खेळाडू व कर्णधार म्हणून त्यांनी योगदान दिले आहे. दळवी यांनी महाराष्ट्र रणजी संघाचे सहाय्यक प्रशिक्षक, महाराष्ट्र महिला संघाच्या १९, २३ वर्षाखालील व वरिष्ठ महिलांच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक, बीसीसीएतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये पश्चिम विभागाच्या वरिष्ठ महीला संघासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. दळवी यांना प्रशिक्षक म्हणून १५ वर्षाचा दिर्घ अनुभव असल्याने त्यांच्याकडे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व वयोगटातील मुलामुलींच्या प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक वयोगटातील मुलामुलींचे सराव शिबिर घेणे, जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंचा शोध घेण्यासाठी टॅलेंट हंट सारखे उपक्रम राबविणे, विविध वयोगटातील व खुल्या गटातील संघांसाठी मुख्य व सहाय्यक प्रशिक्षक नियुक्त करणे व रायगड जिल्ह्यातील क्रिकेट खेळाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची जबाबदरी शंकर दळवी यांच्याकडे देण्यात आली.

आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांच्यासह कमिटीच्या पदाधिकारी, सदस्य, आजी-माजी खेळाडूंनी शंकर दळवी यांना त्यांच्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!