• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जागतिक मंदिर संमेलनात रायगडच्या देवस्थानांचा सहभाग

ByEditor

Jul 25, 2023

जिल्ह्यातील पाच मंदिरांच्या विश्वस्थांची उपस्थिती

गणेश प्रभाळे
दिघी :
पहिल्यांदाच जागतिक मंदिर संमेलनाचे आयोजन देशातील काशी क्षेत्र वाराणसी येथे करण्यात आले. या मंदिर अधिवेशनात श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र हरिहरेश्वरसह जिल्ह्यातील चार मंदिर देवस्थान विश्वस्थांनीही आपला सहभाग नोंदवला.

वाराणसी येथे शनिवारपासून तीन दिवस घेण्यात आलेले जागतिक मंदिर अधिवेशनाचे आयोजन मुंबईतील अंत्योदय प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले. या संमेलनात भारतासह इतर ३५ देशातील मिळून १२०० हून अधिक मंदिर समिती सदस्य सहभागी झाले. या मंदिर अधिवेशनात रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर, बल्लाळेश्वर मंदिर पाली, गणपती मंदिर महड, विरेश्वर मंदिर महाड व धावीर महाराज रोहा या देवस्थानांची उपस्थिती होती.

या संमेलनात सर्व मंदिरांना एका व्यासपीठावर आणुन त्यांचे विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. यामध्ये प्रमुख मंदिर व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, आर्थिक नियोजन, सामाजिक कार्य, स्थान महात्म्य व भविष्याची वाटचाल असे अनेक मुद्यांवर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी श्री देव हरिहरेश्वर कालभैरव मंदिराचे देवस्थान सचिव सिद्धेश पोवार व विश्वस्त निनाद गुरव यांनी भविष्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील मंदिरांसोबत काम करण्यासाठी जिल्ह्यातील पाच मंदिराचे एकत्रित सोशल मीडिया या माध्यमातून व्हॉट्सॲप ग्रुप बनवला आहे. या अधिवेशनास ‘अतुल्य भारत’ या अंतर्गत भारत सरकारचा पाठींबा लाभला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!