• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनाच्या निवासी शिबीराचे उद्घाटन

ByEditor

Dec 21, 2024

प्रतिनिधी
नागोठणे :
येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजीत निवासी श्रमसंस्कार शिबीराचे डॉ. सी. डी. देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी वेलशेत-आंबेघर येथिल पोलिस पाटील मनिषा पाटील, महिला मंडळ अध्यक्ष स्मिता ताडकर, माजी उपसरपंच कांचन माळी ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी विजय आहिरे, कोएसो उप प्रशासकीय अधिकारी डॉ. संदेश गुरव, महाविद्यालयीन प्राध्यापक डॉ. विजय चव्हाण, डॉ. विलास जाधवर, प्रा. जयेश पाटील, डॉ. विकास शिंदे, डॉ. राणी ठाकरे, कु. प्राची दांडेकर, पत्रकार उदय भिसे, महेंद्र माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थी वर्गाने राष्ट्रीय सेवा योजनेकडे एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. कारण या प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकास, नेतृत्व, गुण विकसित करण्याची संधी मिळते. फक्त मार्क्स मिळतात म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेकडे पाहू नका. या प्रसंगी प्रा. डॉ.संदेश गुरव यांनी शिबिराप्रमाणे महाविद्यालयातील वर्गात विद्यार्थी दिसावेत ही आशा व्यक्त केली. प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन डॉ. मनोहर शिरसाठ यांनी केले.

दि. १९ डिसेंबर २०२४ ते २५ डिसेंबर २०२४ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या सात दिवसात शिबीरात अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रमदान, बंधारा, क्रिडा स्पर्धा, महिला मेळावा बुवाबाजी प्रयोग, पथनाट्य ई. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सात दिवसात विविध विषयांवर मान्यवर तज्ञ अभ्यासकांचे व्याख्याने आयोजित केलेली आहेत. शेवटच्या दिवशी सामाजिक संदेश देणाऱ्या विषयांवर पथनाट्य सादरीकरण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या श्रमसंस्कार शिबीराचे यशस्वीपणे आयोजन करण्यासाठी प्र. प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे व प्रा. डॉ. मनोहर शिरसाठ मेहनत घेत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!