• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण शहरातील रहिवासी इमारतीला आग, रहिवासी भयभीत

ByEditor

Dec 26, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
शहरातील एका रहिवासी इमारतीला आग लागण्याची घटना गुरुवारी (दि. २६) दुपारच्या सत्रात घडली आहे. या आगीची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले. सदर आग ही घरातील स्वयंपाक घरात जेवण सुरू असताना खिडकीच्या कपड्याला लागल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र आग लागलेल्या रहिवाशांच्या इमारतीत पारसिक बँक असल्याने ग्राहकांची, रहिवाशांची एकच धावपळ उडाली होती. सदर आगीत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगितले जात आहे.

उरण तालुक्यात गोदामांना, भंगाराच्या दुकानाना, चालत्या वाहनांना आग लागल्याच्या घटना या अगोदर वारंवार घडल्याने रहिवाशी हे आजही भीतीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत. त्यातच उरण शहरातील एका रहिवासी इमारतीला आग लागण्याची घटना गुरुवारी (दि. २६) दुपारच्या सत्रात घडली. या आगीची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले. सदर आग ही घरातील स्वयंपाक घरात जेवण सुरू असताना खिडकीच्या कपड्याला लागल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र आग लागलेल्या रहिवाशांच्या इमारतीत पारसिक बँक असल्याने ग्राहकांची देखील एकच धावपळ उडाली होती. सदर आगीत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगितले जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!