• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शेणवई गावच्या सुनिता महाडिक यांना देवाज्ञा

ByEditor

Dec 26, 2024

शशिकांत मोरे
धाटाव :
रोहा तालुक्यातील शेणवई (वाडी) येथील गावचे पंकज आणि समिर महाडिक यांच्या मातोश्री सुनिताबाई शंकर महाडिक यांना नुकतीच अल्पशा आजाराने देवाज्ञा झाली. निधनासमयी त्यांचे वय ६८ वर्षे होते. त्यांच्या निधनाने महाडिक कुटुंबीयांसह सबंध पंचक्रोशीतील वातावरण शोकाकुल झाले आहे.

अतिशय प्रेमळ, सर्वांशी मिळून मिसळून वागणाऱ्या सूनिताबाई शंकर महाडिक या सर्व आप्तस्वकीय, मित्र परिवार यांच्यामध्ये विशेष प्रिय होत्या. अतिशय काबाडकष्ट करून त्यांनी आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले. कुटुंबात शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभामुळे सर्वांनाच त्या खुप आवडत्या होत्या. आपल्या सुनांवर त्यांनी मूलीसारखे प्रेम केले. पारंपारिक सणासुदिच्या कार्यक्रमात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत. त्यांना अचानक अल्पशा आजाराने ग्रासले त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे कळताच अनेकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी धाव घेतली. त्यांच्या अंत्ययात्रेकरीता मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रिया मंगळवार, दि. ३१ डिसेंबर तर अंतिम धार्मिक उत्तर कार्य विधी शुक्रवार दि. ३ जानेवारी रोजी शेणवई वाडी येथील राहत्या निवासस्थानी होणार आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!