क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित कॅम्पोलियन क्लब टी-२० निवड चाचणी नॉक आऊट क्रिकेट स्पर्धेचा थरार सध्या सुरू आहे. सदरची स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. एसीसी अलिबाग,पेण स्पोर्ट्स असोसिएशन,रायगड राजे पेण व एसबीसी महाड अशे चार संघ उपांत्य फेरी गाठली आहे. ह्या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील ३२ संघांनी सहभाग घेतला होता. जिल्ह्यातील विविध मैदानावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे.
उपांत्य फेरीचे सामने व अंतिम सामना पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण येथे होणार आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना पेण स्पोर्ट्स असोसिएशन विरूद्ध रायगड राजे पेण तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना एसीसी अलिबाग विरूद्ध एसबीसी महाड या संघात रंगणार आहे. शनिवार, दि. २८ व रविवार, दि. २९ डिसेंबर रोजी सदरचे सामने होणार आहेत. स्पर्धेत खेळाडूने केलेल्या कामगिरीच्या आधारावर रायगड जिल्ह्याचा संघ निवडला जाणार असून हा संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित होणाऱ्या आंतर जिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत सहभागी होईल.
