• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन पर्यटनाच्या नकाशावर झळकते आहे – खासदार सुनील तटकरे

ByEditor

Dec 30, 2024

दिवेआगर सुवर्ण गणेश संस्थेच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

अभय पाटील
बोर्ली पंचतन :
सध्या वर्षाअखेरच्या दिवसात दिवेआगर श्रीवर्धनचे किनारे फुलून गेले आहेत. एकाबाजूला पर्यटनदृष्टीने श्रीवर्धन नकाशावर झळकते आहे तर यापुढे पर्यटनावर आधारित परंतु प्रदूषण विरहित रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार असल्याचे खासदार सुनील तटकरे म्हणाले. दिवेआगर सुवर्ण गणेश समितीच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

श्रीवर्धन तालुक्यातील सुप्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिराचे गणपती देव व पूजेची नेमणूक या संस्थेला रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ रोहा, भारत पेट्रोलीयम व नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सीएसआर फंडातून रुग्णवाहिका देण्यात आली, याचे लोकार्पण रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत महमद मेमन, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, उपाध्यक्ष सुचिन किर, माजी सरपंच उदय बापट, माजी सभापती लाला जोशी, दिवेआगर सरपंच सिद्धेश कोसबे, सुवर्ण गणपती देवस्थान समिती अध्यक्ष महेश पिळणकर, युवकाध्यक्ष किरण कांदेकर, डॉ. प्रफुल्ल वाड, देवस्थान समिती सदस्य, ग्रामपंचायत सद्स्य, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार तटकरे म्हणाले की, सध्या आजार व व्याधी वाढत आहेत, यासाठी यापुढे आरोग्य तपासणी शिबिरे राबविण्यात येणार असल्याचे तटकरे म्हणाले. महिला व बालकल्याण मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या विभागातून, केंद्र सरकार निधी व पेट्रोलियम कंपनी सीएसआर फंड अशी सांगड बांधून विविध योजना राबविण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहणार असल्याचे तटकरे म्हणाले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!