प्रतिनिधी
नागोठणे : समस्त नागोठणेवासियांचे श्रद्धास्थान, ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या मूळस्थानी अर्थात पूर्वेकडील डोंगर (घरळी) येथे मंगळवार, दि. ७ जानेवारी २०२५ रोजी सत्यनारायणाची महापूजा व शांती होमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हजारो भाविक देवीचे दर्शन घेण्याकरिता घरळी येथे येत असतात.
सकाळी १० वाजता शांतीहोम, सत्यनारायणाची महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता हळदी कुंकु समारंभाचे आयोजन महिला मंडळ, खडकआळी यांच्यावतीने करण्यात आले आहे. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत नागोठणे संत सेवा मंडळाचा हरिपाठाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी खडकआळी ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ मेहनत घेत आहेत. तरी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ मंडळ खडकआळी, नागोठणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.